नमस्कार मित्रांनो, या लेखात आपण सुधा मूर्ती मराठी माहिती (Sudha Murthy Information in Marathi) पाहणार आहोत. काही माणसे स्वकर्तृत्वाने मोठी झालेली असतात, पण त्यांचं राहणीमान खूप साधं असतं. ही माणसे इतर सामान्य माणसांसोबत वावरत असताना त्यांचा श्रीमंतीचा मोठेपणा इतर माणसांना जाणवत नाही, आणि ती लोक तो जाणवून सुद्धा देत नाहीत.
यशाचा आकाशाला गवसणी घालून सुद्धा त्यांचे पाय मात्र जमिनीवरच असतात. इतके मोठे कर्तृत्व असून सुद्धा हे लोक आपली संस्कृती कधीही विसरत नाहीत. दैनंदिन जीवनात त्यांचा प्रोफेशन सोबत त्यांची संस्कृती सुद्धा जपत असतात. “साधी राहणी आणि उच्च विचारसरणी” हे वाक्य सुधा मूर्ती यांना तंतोतंत लागू होतं.
आज इन्फोसिस टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे नाव संपूर्ण दुनियेमध्ये प्रसिद्ध आहे. एन.आर. नारायण मूर्ती ह्या कंपनीचे संस्थापक अध्यक्ष आहेत. परंतु अशी एक म्हण आहे की “प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो”, तसा मूर्ती ह्यांचा यशामागे त्यांची पत्नी सुधा मूर्ती ह्या आहेत. उद्योगपती, शिक्षक, लेखिका आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या ह्या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेच्या अध्यक्षा सुधा मूर्ती ह्यांचे जीवन व त्यांची यशोगाथा जाणून घेण्यासाठी ह्या लेखात दिलेली सुधा मूर्ती मराठी माहिती जरूर वाचा.
वर्णन | माहिती |
---|---|
पूर्ण नाव | सुधा कुलकर्णी (मूर्ती) |
जन्म तारीख | 19 ऑगस्ट 1950 |
जन्म स्थान | हावेरी, कर्नाटक (शिगगाव) |
वडिलांचे नाव | डॉ. आर. एच. कुलकर्णी |
आईचे नाव | विमला कुलकर्णी |
शिक्षण | बीई (इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग), एमई (कॉम्प्युटर सायन्स) |
पहिला रोजगार | TELCO कंपनी, पुणे (विकास अभियंता) |
पुढील रोजगार | वालचंद ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज (वरिष्ठ प्रणाली विश्लेषक), इन्फोसिस फाउंडेशन (संस्थापिका) |
लेखन | इंग्रजी, कन्नड आणि मराठीमध्ये अनेक पुस्तके लिहिली |
सामाजिक कार्य | इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा, समाजसेविका |
पुरस्कार | विविध राष्ट्रीय पुरस्कार |
वैवाहिक जीवन | एन आर नारायण मूर्ती यांच्याशी विवाह (इन्फोसिसचे संस्थापक), दोन मुलं (अक्षता मूर्ती, रोहन मूर्ती) |
राजकीय कार्य | भारतीय जनता पक्षाकडून राज्यसभा खासदार |
Contents
सुधा मूर्ती यांचा जन्म आणि परिवार
सुधा मूर्ती म्हणजे सुधा कुलकर्णी यांचा जन्म 19 ऑगस्ट 1950 रोजी झाला. त्यांचं जन्मस्थळ कर्नाटक मधील हावेरी येथील शिगगाव. त्या मूळत ब्राम्हण आणि सुशिक्षित कुटुंबातील असल्यामुळे साधेपणा आणि चांगल्या विचारांचे बीज त्यांचा कोवळ्या मनात लहानपणा पासूनच पेरले गेले. त्यांचा वडिलांचे नावं डॉ. आर. एच. कुलकर्णी आणि आईचे नावं विमला कुलकर्णी असे आहे.
घरातील वातावरण शिक्षणासाठी पोषक असल्यामुळे त्यांचा कळ चुकीच्या गोष्टींमध्ये वेळ गुंतवण्यापेक्षा अभ्यासामध्ये वेळ गुंतवण्याकडे अधीक होता. सुधा मूर्ती व त्यांचा तिन्ही भावंडाना घडविण्यात त्यांचा आई वडील व आजी आजोबांचे योगदान अत्यंत महत्वाचे आहे. आणी ही गोष्ट स्वतः मूर्ती त्यांची यशोगाथा सांगत असताना आवर्जून सांगतात.
सुधा मूर्ती यांचे शिक्षण
सुधा मूर्ती यांचा जन्म जरी कर्नाटक मध्ये झाला असला तरी त्यांच बालपण महाराष्ट्रामधील कुरुंदवाड येथे गेलं. त्यांचं प्राथमिक शिक्षण हे मराठी माध्यमिक शाळेतून झाले त्यामुळे त्या आतासुद्धा अस्सलिखित मराठी मध्ये बोलतात.
वडिल डॉक्टर असल्यामुळे वडिलांचे स्वप्न होते मुलींनी डॉक्टर व्हावं. आई शिक्षिका असल्यामुळे आईला वाटत होतं मुलींने प्रोफेसर व्हावं तर आजोबांना वाटत होतं नातीने इतिहासात पी एच डी करावी मात्र सुद्धा मूर्तीनी इंजिनिअरिंग करण्याचा मनाशी पक्क केलं.
सुरुवातील त्यांचा ह्या निर्णयाला घरच्यांनी विरोध दर्शवला कारण त्या काळात मुली सहसा इंजिनअरिंग क्षेत्राकडे वळत नव्हत्या. परंतु सुधा मूर्ती त्याला अपवाद ठरल्या.
सुधा मूर्ती यांनी बीव्हीबी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी मधून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंगमध्ये बीईएनजी डिग्री संपादन केली नंतर त्यांनी १९७४ मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून कॉम्प्युटर सायन्समध्ये एमईएनजी पर्यंतच शिक्षण पूर्ण केलं.
सुधा मूर्ती यांचे करिअर
शिक्षण पूर्ण केल्यानंतर मूर्ती यांनी त्यावेळी भारतात सर्वाधिक प्रसिद्ध असलेली पुण्यातील TELCO ह्या कंपनी मध्ये त्यांना विकास अभियंता म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यानंतर त्यांनी मुंबई व जमशेदपूर इथे सुद्धा काही काळ काम केले.
वालचंद ग्रुप ऑफ इंडस्ट्रीमध्ये आपल्या अनुभवाची झलक दाखवत त्यांना वरिष्ठ प्रणाली विश्लेषक पदी त्यांना नियुक्त करण्यात आले. त्यांनी केलेल्या कामाच्या जोरावर आणी त्यातून मिळालेल्या अनुभवाचा फायदा घेत त्यांनी इन्फोसेस फॉउंडेशन चा पाया रचला.
सुधा मूर्ती ह्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. व ही पुस्तके भारतामध्ये दैनंदिन जीवनात वापरण्यात येणाऱ्या सर्व भाषांमध्ये प्रकाशीत सुद्धा झाली आहेत. त्या इंग्रजी व कन्नड वृत्तपत्रांच्या स्तंभलेखिका म्हणून सुद्धा काम बघत आहेत.
याशिवाय त्या एक समाजसेविका सुद्धा आहेत त्यांची मूर्तिज इन्फोसिस फॉउंडेशन हा धर्मादाय ट्रस्ट असून त्यांचा माध्यमातून त्या अनेक समाज उपयोगी काम करत असतात.
सुधा मूर्ती यांना प्राप्त झालेले पुरस्कार
इन्फोसिसच्या प्रमुख,समाज सेवीका व लेखिका सुधा मूर्ती व त्यांचे पति एन आर नारायण मूर्ति यानी केलेल्या अनेक कौतूकास्पद कमांसाठी त्याना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.त्याना प्रदान करण्यात आलेल्या पुरस्कारां बद्दलची माहिती खालील प्रमाणे :
- 2004: श्री राजा-लक्ष्मी फाउंडेशन तर्फे त्यांचा चेन्नईमधून राजा-लक्ष्मी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला .
- 2006: भारताचा चौथा सर्वोच्च नागरिक पुरस्कार म्हणून गणला जाणारा “पद्मश्री” देऊन त्याना गौरवण्यात आले.
- 2006: आर.के. नारायणांचा साहित्य पुरस्काराने सन्मान करण्यात आला .
- 2010: कर्नाटक सरकारचा चिंतामणी अतिमब्बे पुरस्कार मिळाला.
- 2011: भारतात औपचारिक शिक्षण आणि शिष्यवृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी डॉक्टर ऑफ लॉज (LL.D) पदवी बहाल करण्यात आली.
- 2013: समाजातील योगदानाबद्दल नारायण मूर्ती आणि सुधा मूर्तींना बसव श्री-2013 पुरस्कार देऊन त्यांनी केलेल्या समाजसेवेची ह्या जोड़ीला पोचपावती देण्यात आली.
- 2018: लोकप्रिय (नॉन-फिक्शन) श्रेणीमध्ये गणला जाणारा क्रॉसवर्ड बुक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
- 2019: IIT कानपूर कडून त्याना डॉक्टर ऑफ सायन्सची मानद पदवी बहाल केली.
- 2023: भारताच्या केंद्र सरकारकडून मानाचा पुरस्कार पद्मभूषण देऊन गौरविण्यात आले.
- 2023: साहित्य अकादमी कडून दिला जाणारा बाल साहित्य पुरस्कार बहाल करण्यात आला .
- 2023: $50,000 किमतीचा ग्लोबल इंडियन अवॉर्ड मिळाला,त्याने ही रक्कम फील्ड इन्स्टिट्यूट (टोरंटो विद्यापीठ) ला दान स्वरूपात देऊ केली.
सुधा मूर्ती यांनी लिहिलेली पुस्तके
सुधा मूर्ती यानी कन्नड ,मराठी व इंग्रजी अशा अनेक भाषांमध्ये पुस्तके लिहिली.त्यानी लिहिलेल्या काही पुस्तकांच्या आवृत्ती मराठी मध्ये सुद्धा उपलब्ध आहेत त्यांची आम्ही खालील प्रमाणे देत आहोत.
सुधा मूर्तीच्या मराठीत लिहिलेल्या पुस्तकांची यादी:
- अहिंसा
- वाट पाहतायेत का?
- महाश्वेता
- आंबाची खेळे
- विमानाची वाट
- बालाजी वन
- महाश्वेता
- ग्रामपंचायत
- मोगरीला एक अविष्कार
- महिमा: एक भेट
- मानवी: एक दृष्टि
- योगमाया
- नगरपालिका
सुधा मूर्ती यांचे वैयक्तिक जीवन
टेल्को कंपनीमध्ये काम करताना, त्यांची ओळख एन आर नारायण मूर्ती यांशी झाली. दोघांचे प्रेम जुळले आणि नंतर ही जोडी विवाह बंधनात अडकली. ह्या दाम्पत्यला एक मुलगी आणि एक मुलगा असून, मुलीचे नाव अक्षता मूर्ती आणि मुलाचे नाव रोहन मूर्ती असे आहे. अक्षता मूर्ती हीचे लग्न झाले असून, विद्यमान ब्रिटिश पंतप्रधान ऋषीं सुनक ह्यांची ती पत्नी आहेत.
सुधा मूर्ति यांना भारतीय जनता पक्षाकडून राज्यसभेची खासदारकी देण्यात आली असून ते ह्या पदाला योग्य न्याय देत आहेत.
FAQs
कोण आहेत सुधा मूर्ती जी?
सुधा मूर्ती ह्या एक विश्वासार्ह व्यक्तिमत्वाच्या भारतीय लेखिकेत समाजसेविकेत आणि उद्योग क्षेत्रातील अग्रगण्य नावाच्या आदर्श महिलांपैकी एक आहेत. त्यांचे उपनाम “इन्फोसिसच्या माई” आहे. सुधा मूर्ती यांनी भारतीय साहित्यात अनेक प्रमुख पुस्तके लिहिली आहेत आणि त्यांच्याकडून समाजसेवा क्षेत्रात अनेक महत्वाच्या काम केल्या आहेत.
सुधा मूर्ती महाराष्ट्रीयन आहेत का?
सुधा मूर्ती ह्या महाराष्ट्रीयन नाहीत. त्यांचं जन्म कर्नाटक राज्यातील शिगगाव या गावात झालं होतं. त्यांच्या मातृभाषा कन्नड आहे. परंतु, त्यांच्याकडून मराठी माध्यमातून पुस्तके लिहिण्याची कला आहे आणि मराठीत लेखण्याचा आवड आहे.
सुधा मूर्ती यांनी टेल्कोचा राजीनामा का दिला?
सुधा मूर्ती आणि त्यांचे पती एन.आर. नारायण मूर्ती यांनी इन्फोसिस टेक्नॉलॉजीज लिमिटेड नावाची कंपनी सुरू करण्याचे ठरवले. पतीला मदत करण्यासाठी सुधा मूर्ती यांनी टेल्कोचा राजीनामा दिला.
सुधा मूर्ती यांनी भारतात नोकरी करण्याचा विचार का केला नाही?
सुधा मूर्ती ह्यांची शैक्षणिक अर्हता उत्तम होती, तसेच त्यांना परदेशात जाऊन नोकरी करण्यामध्ये रस असल्यामुळे त्यांनी भारतात नोकरी करण्याचा विचार केला नाही.
निष्कर्ष
आम्हाला विश्वास आहे की या लेखात प्रस्तुत सुधा मूर्ती मराठी माहिती (Sudha Murthy Information in Marathi) तुम्हाला नक्कीच आवडली असेल. ही माहिती तुम्ही तुमच्या मित्र आणि प्रियजनांबरोबर नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही सुधा मूर्ती यांचे जीवन आणि त्यांच्या सामाजिक योगदानाची माहिती मिळेल.
तुम्ही आमच्या वेबसाईटवर असे अनेक रोचक लेख वाचू शकता. जर तुम्ही आमच्या ग्रुपमध्ये सामील होऊ इच्छित असाल आणि नवीनतम अपडेट्स आणि माहिती मिळवू इच्छित असाल, तर कृपया आमच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा. धन्यवाद!